६० सेकंदात स्मार्टफोन चार्ज करणारी नवी बॅटरी

 एकदा आयफोन ६ चार्ज करण्यासाठी आपल्याला दोन तास चार्जिंगची आवश्यकता असते. पण आता अशा एका अॅल्युमिनिअम बॅटरीचा शोध लागला आहे, की ज्यामुळे हा फोन केवळ साठ सेकंदात म्हणजे एका मिनिटात चार्ज होऊ शकतो. 

Updated: Apr 7, 2015, 03:20 PM IST
६० सेकंदात स्मार्टफोन चार्ज करणारी नवी बॅटरी title=

स्टँडफर्ड  :  एकदा आयफोन ६ चार्ज करण्यासाठी आपल्याला दोन तास चार्जिंगची आवश्यकता असते. पण आता अशा एका अॅल्युमिनिअम बॅटरीचा शोध लागला आहे, की ज्यामुळे हा फोन केवळ साठ सेकंदात म्हणजे एका मिनिटात चार्ज होऊ शकतो. 

स्टँडफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी अशी एक अॅल्युमिनिअम बॅटरी शोधली आहे, त्याच्या सहाय्याने आपण कोणताही फोन केवळ एका मिनिटात संपूर्ण चार्ज करू शकतो. ही बॅटरी बाजारात आली तर एकूण मोबाईल इंडस्ट्रीत क्रांती होऊ शकते. 

या नव्या बॅटरीच्या सहाय्याने आपण फोन, लॅपटॉप, टॅबलेट शून्य ते १०० टक्के चार्जिंग केवळ ६० सेकंदात करू शकणार आहोत. 

ही बॅटरी सध्याच्या लिथिअम बॅटरीच्या सात पट जास्त चालणारी आहे. सध्याची आपण वापरणारी बॅटरी १ हजारवेळा रिचार्ज करू शकतो. तर ही नवीन बॅटरी ७५०० वेळा चार्ज करू शकतो. 

सध्याच्या बॅटरीला लागणाऱ्या व्होल्टेजपेक्षा निम्म्या व्होल्टेजमध्ये चार्ज होते. यापेक्षाही चांगले आउटपूट देण्याची हमी शास्त्रज्ञांनी दिली आहे. 

पाहू या कशी आहे नवीन बॅटरी.... (व्हिडिओ) 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.