सॅमसंगच्या बॅटरीमध्ये हेरगिरीची चिप नाही

गेल्या काही दिवसात सोशल नेटवर्किंगवर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. सॅमसंग स्मार्टफोनच्या बॅटरीवर NFC स्टिकरच्या माध्यमातुन आपल्या मोबाईलमधील वैयक्तीक गोष्टी हॅक केल्या जातात असा हा व्हिडीओ होता. या व्हिडीओत एक व्यक्ती NFC टॅग काढून दाखवताना दिसत होती. पण यात काही तथ्य नाही.

Updated: Jun 29, 2015, 04:03 PM IST
सॅमसंगच्या बॅटरीमध्ये हेरगिरीची चिप नाही title=
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात सोशल नेटवर्किंगवर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. सॅमसंग स्मार्टफोनच्या बॅटरीवर NFC स्टिकरच्या माध्यमातुन आपल्या मोबाईलमधील वैयक्तीक गोष्टी हॅक केल्या जातात असा हा व्हिडीओ होता. या व्हिडीओत एक व्यक्ती NFC टॅग काढून दाखवताना दिसत होती. पण यात काही तथ्य नाही.
 
NFC स्टिकर हा शक्यतो नजरेला येत नाही त्यामुळे त्या स्टिकरच्या माध्यमातून हॅकिंग केले जाते असं या व्हिडीओत दिसत होतं. बऱ्याच लोकांना या स्टिकरबद्दल माहितीही नसते. NFC टॅग उपकरणाच्या 20 सेंमीच्या कक्षेतच काम करते. 
 
या व्हिडीओत त्या व्यक्तीने हा प्रकार दाखवत हा स्टिकर काढून टाकलाय.
या व्हिडीओने बऱ्याच लोकांच लक्ष वेधलय पण हा व्हिडीओ तयार करण्याच कारण अजून गुलदस्त्यात आहे.
 
पाहा सत्य उघड करणारा व्हिडिओ

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.