लेनोवोचा दमदार 'के-३ नोट' भारतात लॉन्च, किंमत ९,९९९ रुपये!

मूळची चीनी कंपनी लेनोवोनं आपला एक नवा स्मार्टफोन भारताय बाजारात लॉन्च केलाय. या स्मार्टफोनचं नाव आहे... 'के-३ नोट'... 

Updated: Jun 25, 2015, 04:51 PM IST
लेनोवोचा दमदार 'के-३ नोट' भारतात लॉन्च, किंमत ९,९९९ रुपये! title=

नवी दिल्ली : मूळची चीनी कंपनी लेनोवोनं आपला एक नवा स्मार्टफोन भारताय बाजारात लॉन्च केलाय. या स्मार्टफोनचं नाव आहे... 'के-३ नोट'... 

या मोबाईलच्या एन्ट्रीनंतर १० हजार रुपयांपर्यंत बजेटच्या स्मार्टफोनमध्ये खूप मोठी स्पर्धा वाढीस लागू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. 

स्मार्टफोन के-३ नोट गेल्या वर्षी चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. भारतात मात्र या फोनची किंमत ९,९९९ रुपये इतकी निर्धारित करण्यात आलीय.

'के-३ नोट'चे फिचर्स... 
- ५.५ इंचाचा डिस्प्ले (१९२० X १०८०)
- अॅन्ड्राईड व्हर्जन लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम
- १३ मेगापिक्सल कॅमेरा
- ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- इंटरनल मेमरी १६ जीबी
- एक्स्पान्डेबल मेमरी ३२ जीबी
- थ्री जी, फोर जी, LTE ची सुविधा
- ३,००० मेगाहर्टझची बॅटरी
- रॅम २ जीबी
- ड्युएल सिमची सुविधा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.