सॅमसंगचा 105 इंचाचा सगळ्यात मोठा 'कर्व्ड' टीव्ही!

कोरियन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगनं जगातील सगळ्यात जास्त लवचिक असलेला ‘अर्व्ड’अल्ट्रा हाय डेफिनेशन (यूएचडी) टेलिव्हिजन सेट सादर केलाय.

Updated: Sep 5, 2014, 02:55 PM IST
सॅमसंगचा 105 इंचाचा सगळ्यात मोठा 'कर्व्ड' टीव्ही!  title=

बर्लिन : कोरियन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगनं जगातील सगळ्यात जास्त लवचिक असलेला ‘अर्व्ड’अल्ट्रा हाय डेफिनेशन (यूएचडी) टेलिव्हिजन सेट सादर केलाय.

या टीव्हीचा आकार 105 इंच आहे. ‘सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स’चे वरिष्ठ संचालक मायकल जोलर यांच्या म्हणण्यानुसार, हा105 इंचाचा यूएचडी टीव्ही आहे.... आणि हा जगातील पहिला आणि सगळ्यात जास्त लवचिक (बेन्डेबल) टीव्ही आहे’.

हा टीव्ही सध्या युरोपीय बाजारांत सादर करण्यात आलाय. या टीव्हीची किंमत नेमकी किंमत किती असेल याचा मात्र खुलासा अजून करण्यात आलेला नाही. कंपनीनं ‘कर्व्ड’ जवळपास 17 मॉडेल याआधीच विकलेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.