मुंबई : 'अॅपल' या मोबाईल कंपनीने 'आयफोन ६एस' आणि '६एस प्लस' हे फोन सप्टेंबर २०१५मध्ये बाजारात आणले होते. तेव्हा त्याची जोरदार विक्री झाली. चीनमध्ये आयफोनच्या विक्रीत सर्वात मोठी घट झाली आहे.
२०१५च्या सुरुवातीला 'आयफोन'च्या विक्रीत ४६ टक्के वाढ झाली होती. मात्र त्यानंतर त्याला उतरती कळा लागली. या वर्षात आयफोन 7 येणार असल्याने सर्व आशा त्याच्यावरच आहे. काही नव्या फिचर्स मुळे लोक हा मोबाईल घेतील असं आयफोन कंपनीचं म्हणणं आहे.
'आयफोन ७'मध्ये वायरलेस हेडफोन, फेस टच तंत्रज्ञान, वॉटरप्रूफ असे नवे फिचर्स असल्याने युझर्स फोन अपग्रेड करतील अशी 'अॅपल'ला अपेक्षा आहे.