रिलायन्स जिओचे ग्राहक अजूनही घेऊ शकतात याचा फायदा

ट्रायने रिलायंस जिओला 'समर सरप्राईज ऑफर' बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पण रिलायंस जिओने ही ऑफर मागे घेण्याचं मन बनवलं आहे. पण जिओचे ग्राहक अजूनही याचा फायदा घेऊ शकतात.

Updated: Apr 8, 2017, 05:11 PM IST
रिलायन्स जिओचे ग्राहक अजूनही घेऊ शकतात याचा फायदा title=

नवी दिल्ली : ट्रायने रिलायंस जिओला 'समर सरप्राईज ऑफर' बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पण रिलायंस जिओने ही ऑफर मागे घेण्याचं मन बनवलं आहे. पण जिओचे ग्राहक अजूनही याचा फायदा घेऊ शकतात.

ट्रायच्या आदेशानंतर जिओने लगेचच ही ऑफर बंद नाही केली आहे. जिओची वेबसाइट www.jio.com च्या पेजवर जाताच तुम्हाला एक नोटिफिकेशन दिसेल. यामध्ये म्हटलं आहे की, पुढच्या काही दिवसांमध्ये समर सरप्राईज ऑफर बंद होणार आहे. पण तोपर्यंत ही सुविधा घेता येणार आहे. जिओने ही ऑफर कधी बंद होणार याबाबत काहीही म्हटलेलं नाही.