जिओची धमाकेदार ऑफर, मिळणार डबल डेटा

जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवीन नवीन ऑफर आणत आहे. एक ऑफर संपत नाही की दुसरी ऑफर लगेचच जाहीर केली जात आहे. आता पुन्हा एकदा जिओने नवी ऑफर आणली आहे.

Updated: Apr 20, 2017, 10:01 AM IST
जिओची धमाकेदार ऑफर, मिळणार डबल डेटा title=

मुंबई : जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवीन नवीन ऑफर आणत आहे. एक ऑफर संपत नाही की दुसरी ऑफर लगेचच जाहीर केली जात आहे. आता पुन्हा एकदा जिओने नवी ऑफर आणली आहे.

जिओ आणि सॅमसंगने एकत्र येत ही ऑफर जाहीर केली आहे. जर तुम्ही नवीन सॅमसंग गॅलेक्सी एस8 किंवा गॅलेक्सी एस-8 प्लस घेतला तर तुम्हाला ही ऑफर मिळणार आहे. 

३०९ रुपयांच्या मासिक रिचार्जवर  448GB 4G डेटा ८ महिन्यांसाठी मिळणार आहे. म्हणजेच दिवसाला २ जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच धन धना धन ऑफरच्या दुप्पट डेटा तुम्हाला मिळणार आहे. 

ही ऑफर ५ मे पासून ८ महिन्यांसाठी असणार आहे. ही ऑफर फक्त जिओ युजर्ससाठी असणार आहे. ज्यांनी प्राईम मेंबरशिप घेतली आहे.