खरेदी करा स्मार्टफोन आणि एक वर्ष फ्री ४ जी इंटरनेट

 रिलायन्स जिओचा धमाक्यानंतर मुकेश अंबानीच्या कंपनीने रिलायन्स रिटेलने नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर आता त्याची चर्चा सुरू आहे. कारण या फोन सोबत युजर्सला एक जबरदस्त ऑफर आहे. 

Updated: Nov 1, 2016, 05:06 PM IST
खरेदी करा स्मार्टफोन आणि एक वर्ष फ्री ४ जी इंटरनेट  title=

नवी दिल्ली :  रिलायन्स जिओचा धमाक्यानंतर मुकेश अंबानीच्या कंपनीने रिलायन्स रिटेलने नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर आता त्याची चर्चा सुरू आहे. कारण या फोन सोबत युजर्सला एक जबरदस्त ऑफर आहे. 

रिलायन्स रिटेलच्या नवा LYF ब्रँडने नवा स्मार्टपोन F1 प्लस बाजारात आणला आहे. या फोनची किंमत केवळ १३ हजार ९९ रुपये आहे. या फोनवर रिलायन्स जिओच्या सर्व सुविधा फ्री देण्यात आल्या आहे. एक वर्षापर्यंत ४ जी इंटरनेट मोफत मिळणार आहे. 

या फोनची ऑनलाइन विक्री स्नॅपडीलवर सुरू आहे. याची विशेषता म्हणजे हा फोन ४ जी एलटी बँडला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास दिला आहे. तसेच हा फोन ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे.