रिलायन्स जिओचा स्वस्त स्मार्टफोन लाईफ विंड ४

रिलायन्स जिओ या वर्षी ४जी सेवा सुरु करण्याची तयारी करीत आहे. ही कंपनी आपला नवा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या मोबाईलचा हॅंडसेट लाईफ विंड ४ असा असणार असून याची किंमत ६,७९९ रुपये असेल.

Updated: May 21, 2016, 08:21 PM IST
रिलायन्स जिओचा स्वस्त स्मार्टफोन लाईफ विंड ४ title=

मुंबई : रिलायन्स जिओ या वर्षी ४जी सेवा सुरु करण्याची तयारी करीत आहे. ही कंपनी आपला नवा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या मोबाईलचा हॅंडसेट लाईफ विंड ४ असा असणार असून याची किंमत ६,७९९ रुपये असेल.

हा स्मार्टफोन दोन सिमचा असून ४,००० एमएएच बॅटरी क्षमता असेल. १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल मेमरी असणार आहे. कंपनीने दावा केलाय की, या फोनचा एलसीडी डिस्प्ले ५ इंच आहे. ८ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असून फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सेल आहे.