जिओच्या लाईफ फोनमध्ये स्फोट

अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोनचा स्फोट होण्याच्या घटना घडत असतानाच जिओच्या लाईफ स्मार्टफोनचा स्फोट झाल्याची घटना समोर आलीये.

Updated: Nov 7, 2016, 01:09 PM IST
जिओच्या लाईफ फोनमध्ये स्फोट title=

नवी दिल्ली : अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोनचा स्फोट होण्याच्या घटना घडत असतानाच जिओच्या लाईफ स्मार्टफोनचा स्फोट झाल्याची घटना समोर आलीये.

ट्विटर यूझर तारिक सद्दीकने याबाबतची माहिती आणि फोटो मायक्रोब्लॉगिंग साईटवर शेअर केलेत. मात्र लाईफच्या कोणत्या मॉडेलच्या स्मार्टफोनचा स्फोट झालाय हे अद्याप कळू शकलेले नाही. 

दरम्यान, कंपनीने याची गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी तपास करत असल्याचे कंपनीने स्पष्ट केलंय. यूजर्सची सुरक्षितता ही कंपनीची प्राथमिकता असून लवकरच यावर तोडगा निघेल, असेही कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलेय.