मुंबई पालिकेत त्वरीत १५४ रिक्त पदे भरणार

महापालिकेत १५४ आवश्यक पदे भरण्यात येणार आहे. पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील वैद्यकीय विशेषज्ञ सल्लागार या संवर्गातील नवनिर्मित रिक्त पदे कंत्राटी तत्त्वावर ३० दिवसांकरिता त्वरीत भरण्यात येणार आहे. तसेच प्रतीक्षा यादी बनविण्याकरिता भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

Updated: Jan 31, 2015, 02:14 PM IST

मुंबई : महापालिकेत १५४ आवश्यक पदे भरण्यात येणार आहे. पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील वैद्यकीय विशेषज्ञ सल्लागार या संवर्गातील नवनिर्मित रिक्त पदे कंत्राटी तत्त्वावर ३० दिवसांकरिता त्वरीत भरण्यात येणार आहे. तसेच प्रतीक्षा यादी बनविण्याकरिता भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

विहित अर्ज प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खातेप्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांच्या कार्यालय, ७ वा मजला, के. बी. भाभा रुग्णालय इमारत, आर. के. पाटकर मार्ग, वांद्रे, प. येथे खुल्यावर्गासाठी २६७ अधिक व्हॅट आणि मागासवर्गीयांसाठी १३४ अधिक व्हॅट शुल्क आकारुन मिळतील. 

कार्यालयनी सुट्ट्या वगळता कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३.३० वाजता मिळतील. अंतिम तारीख १३ फेब्रुवारी २०१५ आहे.

पाहा जाहिरात -

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.