मुलींना लग्नादरम्यान विचारले जातात हे ५ प्रश्न

भारतीय संस्कृतीत लग्न म्हटलं की सुरुवात असते ती मुला-मुलींना पाहण्यापासून. आई-वडील मुलांसाठी मुलगा किंवा मुलगी बघत असतात. जेव्हा मुलीला मुलाचे नातेवाईक पाहायला येतात तेव्हा पासून प्रश्न सुरू होतात आणि लग्नानतंरही बरेच दिवस ते सुरू असतात. पाहा काय असतात ते प्रश्न जे मुलींना विचारले जातात.

Updated: Jan 17, 2016, 05:13 PM IST
मुलींना लग्नादरम्यान विचारले जातात हे ५ प्रश्न  title=

मुंबई : भारतीय संस्कृतीत लग्न म्हटलं की सुरुवात असते ती मुला-मुलींना पाहण्यापासून. आई-वडील मुलांसाठी मुलगा किंवा मुलगी बघत असतात. जेव्हा मुलीला मुलाचे नातेवाईक पाहायला येतात तेव्हा पासून प्रश्न सुरू होतात आणि लग्नानतंरही बरेच दिवस ते सुरू असतात. पाहा काय असतात ते प्रश्न जे मुलींना विचारले जातात.

१. जेवण बनवायला आवडते का ?
लग्नाआधी आणि नंतरही प्रत्येक मुलीला हमखास विचारला जाणारा हा एक प्रश्न आहे.

२. लग्नानंतर जॉब करणार का ? 
हा एक एसा प्रश्न आहे जो आजकालच्या मुलींना विचारला जातोच. लग्न ठरण्याअगोदरच या प्रश्नाला सुरुवात होते.

३. वेगळे राहणार का ? 
बऱ्याचदा हा प्रश्न घरच्यांपेक्षा बाहेरच्या लोकांना पडलेला असतो. मुलीला लग्नानंतर स्वातंत्र्य मिळेल का ? लग्नानंतर एकत्र राहणार की वेगळं ? याबाबत इतरांनाच जास्त उत्सूकता असते.

४. आनंदाची बातमी कधी ? : 
लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच मुलीला हा प्रश्न विचारला जातो. मुलींना या बाबत बोलण्याची इच्छा नसतानाही उत्तर द्यावे लागते.

५. हनीमुनला कोठे जाणार ?
मित्रमंडळी आणि नातेवाईक स्त्रिया हा प्रश्न खूप विचारतात. लग्नानंतर हनीमुनला जाणं हा एक ट्रेंड बनला आहे. त्यामुळे हा प्रश्न साहजिकच विचारला जातो.