सॅन फ्रान्सिस्को: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. तिथं फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गसोबत पंतप्रधान चर्चा करतील. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी फेसबुकचं संपूर्ण कार्यालय सज्ज झालंय. कंपनीनं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू केलाय.
आणखी वाचा - भारताचा कायापालट करण्यासाठी डिजीटल इंडिया महत्त्वाचं - पंतप्रधान
पुरुषांसाठी सुट आणि महिलांना चांगले कपडे घालण्यास सांगण्यात आलंय. कंपनीनं महिलांना स्लीवलेस शर्ट आणि शॉर्ट्स न घालण्याचा सल्ला दिलाय. हा नियम अशा कंपनीत लागू होतोय ज्याचे सीईओ मार्क झुकरबर्ग स्वत: नेहमी ग्रे-टीशर्ट आणि जींसमध्ये असतो.
झुकरबर्ग एकच ड्रेस का घालतो
एकच ड्रेस का घालतो, हा प्रश्न झुकरबर्गला विचारला असता, त्यानं सांगितलं त्याच्याजवळ एकाच रंगाचे सर्व शर्ट्स आहेत. मात्र झुकरबर्ग एकदा वर्ल्ड लीडर्सच्या भेटीदरम्यान सूट आणि टाय घालून फॉर्मल ड्रेसमध्ये दिसला होता.
आणखी वाचा - स्टीव्ह जॉब्स प्रेरणा घेण्यासाठी भारतात आले होते - टिम कुक
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.