VIDEO : जेव्हा पती पेंग्विननं आपल्या पत्नीला घरभेद्यासोबत पाहिलं...

सध्या इंटरनेटवर एका व्हिडिओनं धुमाकूळ घातलाय... हा व्हिडिओ आहे दोन पेंग्विनच्या भांडणाचा... 'नॅशनल जिओग्राफी' चॅनलनं हा व्हिडिओ प्रसारित केलाय. 

Updated: Nov 5, 2016, 09:20 PM IST
VIDEO : जेव्हा पती पेंग्विननं आपल्या पत्नीला घरभेद्यासोबत पाहिलं... title=

मुंबई : सध्या इंटरनेटवर एका व्हिडिओनं धुमाकूळ घातलाय... हा व्हिडिओ आहे दोन पेंग्विनच्या भांडणाचा... 'नॅशनल जिओग्राफी' चॅनलनं हा व्हिडिओ प्रसारित केलाय. 

सध्या मुंबईत पेंग्विनचा मुद्दा चर्चेत आहेच... त्यातच हा पेंग्विनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ जवळपास 
121,572 जणांनी रिट्विट केलाय. तर 132,468 जणांनी हा व्हिडिओ लाईक केलाय. 

या व्हिडिओत, आपल्या पत्नी पेंग्विनला दुसऱ्या पेंग्वीनसोबत पाहिल्यानंतर पती त्याच्यावर झडप घालतो... दोघंही जखमी झाल्यानंतर कुणाची निवड करायची हा निर्णय मादी पेंग्विनवर सोपवला जातो... आणि ती दुसऱ्याच पेंग्विनची निवड आपला जोडीदार म्हणून करताना दिसते.