व्हॉट्सअॅपवरुन आता लँडलाईनवर कॉलिंगची सुविधा

व्हॉट्सअॅपची वाढती लोकप्रियता लक्षात घेता आता लवकरच व्हॉट्सअॅपवर लँडलाईन आणि मोबाईल फोन नंबर्सवर कॉलिंगची सुविधा सुरु होणार आहे. 

Updated: Mar 29, 2016, 10:50 AM IST
व्हॉट्सअॅपवरुन आता लँडलाईनवर कॉलिंगची सुविधा title=

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपची वाढती लोकप्रियता लक्षात घेता आता लवकरच व्हॉट्सअॅपवर लँडलाईन आणि मोबाईल फोन नंबर्सवर कॉलिंगची सुविधा सुरु होणार आहे. 

इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आणि टेलिकॉम यांच्यात इंटर-कनेक्ट कराराला सरकारने संमती दिली आहे. या निर्णयामुळे इंटनेट स्थित वॉईस कॉलिंग अॅपची लोकप्रियता अधिक वाढू शकते. 

या अॅपवरुन लँडलाईन अथवा मोबाईल फोन नंबरवर कॉलिंगची सुविधा देणारे फीचर आल्यास व्हॉईस कॉलचे चार्ज कमी होऊ शकतात. 

दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये अद्याप इंटरनेट नेटवर्कची समस्या येते. त्यामुळे हे फीचर वापरणाऱ्यांची संख्या कमी असू शकते. जेथे ब्रॉडबँड सर्व्हिस नाही तेथे या अॅप्सवरुन कॉलिंग करणे तितकेसे शक्य होणार नाही.