खुशखबर: आता नोकिया लुमिया ही झाला स्वस्त

Updated: Jun 24, 2014, 06:29 PM IST
खुशखबर: आता नोकिया लुमिया ही झाला स्वस्त title=

मुंबईः जर तुम्ही नोकिया लुमिया विकत घेण्याच्या विचारात आहात, तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. नोकिया आपले स्मार्टफोन लुमिया 520, 620 आणि 720 सीरीज असलेले विडोंज 8.1 प्लेटफार्मवर आणत आहे. 

नोकिया लुमिया 520 ची सध्याची किंमत 7 हजार पाचशे पाच रुपये, 620ची किंमत 10 हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि 720 ची 15 हजार नऊशे एकोणऐंशी रुपये आहे. या व्यतिरिक्त या स्मार्टफोनची किंमत 7 हजार रुपयांपर्यंत पोहचू शकते. म्हणजे या सीरिजची किंमतच कमी होणार आहे. 

नोकिया इंडियाचे एमडी पी. बालाजी यांनी एक इंग्रजी वर्तमानपत्राला माहिती देताना सांगितले की, लुमिया सीरीज आता पहिल्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत मिळणार असून नोकिया इंडिया सध्या 8 हजार ते 12 हजार रुपये किंमतीच्या येणाऱ्या विडोंज बेस्ट स्मार्टफोनवर लक्ष देत आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.