नोकियाचा सर्वात स्वस्त मल्टिमीडिया फोन

नोकियानं (मायक्रोसॉफ्ट) दोन नवीन मोबाईल फोन लॉन्च केलेत. नोकिया 130 आणि नोकिया 130 ड्युएल सिम असे हे दोन हॅन्डसेट आहेत. किंमतीच्या मानानं या फोनमध्ये अनेक फिचर्सची बरसात करण्यात आलीय. 

Updated: Aug 13, 2014, 08:25 AM IST
नोकियाचा सर्वात स्वस्त मल्टिमीडिया फोन title=

मुंबई : नोकियानं (मायक्रोसॉफ्ट) दोन नवीन मोबाईल फोन लॉन्च केलेत. नोकिया 130 आणि नोकिया 130 ड्युएल सिम असे हे दोन हॅन्डसेट आहेत. किंमतीच्या मानानं या फोनमध्ये अनेक फिचर्सची बरसात करण्यात आलीय. 

या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बिल्ट इन व्हिडिओ प्लेअर आणि म्युझिक प्लेअर आहे. या फोनची स्क्रीन 1.8 इंचाची आहे तर रिझॉल्युशन 160 X 128 पिक्सल आहे. नोकियाची ही मोबाईल सीरिज 30+os वर आधारित आहेत. 

मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च झालेल्या, नोकिया 180 ड्युएल सिम फोनमधल्या एफएम रेडिओसारखाच या फोनमध्येही एफएम रेडिओ आढळतो. 

यामध्ये, ब्लुटूथ आहे पण यामध्ये कॅमेऱ्याची सुविधा मात्र उपलब्ध नाही. या फोनचं वजन 68 ग्रॅम आहे तर जाडी आहे 13.9 मिमी... हा फोन तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. 

या फोनची किंमत 19 युरो म्हणजेच जवळपास 1,550 रुपये आहे. हा फोन भारतात पुढच्या महिन्यात उपलब्ध होऊ शकेल. या फोनची सूचना आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.