इतर नेटवर्कवरही आता बोला बिनधास्त!

लवकरच, तुमच्या मोबाईल बिलाच्या दरांमध्ये कपात होऊ शकते. दूरसंचार नियामक मंडळानं (ट्राय)नं याचे संकेत दिलेत. 

Updated: Feb 3, 2015, 12:15 PM IST
इतर नेटवर्कवरही आता बोला बिनधास्त! title=

नवी दिल्ली : लवकरच, तुमच्या मोबाईल बिलाच्या दरांमध्ये कपात होऊ शकते. दूरसंचार नियामक मंडळानं (ट्राय)नं याचे संकेत दिलेत. 

ट्रायनं दिलेल्या माहितीनुसार, इंटरकनेक्ट युझेस चार्जेस कमी केले जाऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांचा बिलामध्ये बराच फरक पडू शकतो.

येत्या 15 ते 20 दिवसांत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. जर, हा निर्णय अंमलात आणला गेला तर उपभोक्त्यांच्या कॉल दरांत 20 टक्के कपात होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ऑपरेटर कंपनी दुसऱ्या ऑपरेटरचा कॉल आपल्या नेटवर्कवर जोडण्यासाठी 20 पैसे प्रति कॉलच्या दरानं शुल्क आकारतात. ट्रायच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ऑपरेटर कंपन्यांकडे कॉलशिवाय मोबाईलवर कमावण्यासाठी आणखी कोणताही ऑप्शन नव्हता, त्यावेळी ही शुल्क व्यवस्था लागू करण्यात आली होती. ज्या ऑपरटेरच्या नेटवर्कवर कॉल जातोय त्यांनाही याचा फायदा व्हावा, हा यामागचा उद्देश होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.