www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ७५००-२०२०० रूपये अधिक ग्रेड पे २४०० रूपये अधिक भत्ते आणि वेतन श्रेणीतील लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) या संवर्गातील प्रवर्गनिहाय सध्या रिक्त असलेली तसेच संभाव्य रिक्त होणारी एकूण ९८ पदे भरण्यात येणार आहेत. विहित अर्हता व अटींची पूर्तता करणार्या इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील वैयक्तिक माहितीपत्र (Bio-Data) आणि आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रतींसह Walk-In-Selection पध्दतीच्या थेट भरती प्रक्रियेसाठी व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक आरक्षणांतर्गत पदे, अजा अज विजा भज भज भज विमाप्र इमाव मागासवर्गीय प्रवर्ग रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. समांतर आरक्षणांतर्गत भरावयाची पदे महिला (३० टक्के) - २९, माजी सैनिक (१५ टक्के) १५, प्रकल्पग्रस्त (५टक्के) ५, भूकंपग्रस्त (२ टक्के) २, खेळाडू (५ टक्के) ५, सुशिक्षित बेरोजगार (१० टक्के) १०, सर्वसाधारण सामाजिक - ३२ , तर आरक्षणांतर्गत भरावयाची एकूण रिक्त पदे अपंक (३टक्के) अंध/क्षीणदृष्टी - २, श्रवण शक्तीतील दोष - ३, चलनवलन विषयक विकलांगता किंवा मेंदूचा अर्धांगवायू - २ = ७ (एकूण रिक्त पदांमधील). रिक्त पदाची संख्या, आरक्षण/अनुशेष यात बदल होण्याची शक्यता आहे.
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
प्रकल्पग्रस्तांसाठी सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ११ महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम १९९९ नुसार शासनाने विहित केलेले नियम आणि बृहन्मुंबई महानगरपालिका ठराव क्र. १० दि. ०३.०४.०८ अन्वये मंजूर झालेली मार्गदर्शक तत्वे यानुसार नगरबाहय़ विभागातील ज्या प्रकल्पग्रस्तांची जमीन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलप्रकल्पासाठी संपादित केली आहे. अशा प्रकल्पग्रस्तांसाठीची आरक्षित पदे भरण्यात येणार आहेत.
आवश्यक पात्रता - लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी)
- उमेदवार माध्यमिक शालांत किंवा तत्सम प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने शालांत किंवा तत्सम परीक्षेत प्रत्येकी १०० गुणांचे मराठी व इंग्रजी हे विषय घेतलेले असावेत.
- टंकलेखन व लघुलेखनातील किमान आवश्यक गती
- संगणकविषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोर्मयादा : उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिका सेवेत नसल्यास, त्याचे वय अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास
अ) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत - १८ ते ३३ वर्ष
ब) मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत - १८ ते ३८ वर्षे
क) माजी सैनिकांसाठी शासन सेवेतील वर्ग-३ व वर्ग-४ मधील पदांसाठी नेमणूकीकरीता विहित वयोर्मयादेतील सुट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक ३ वर्ष इतकी राहिल. तसेच, अपंग माजी सैनिकांसाठी शासन सेवेतील वर्ग-३ व वर्ग-४ मधील पदांसाठी नेमणुकीकरिता कमाल वयोर्मयादा ४५ वर्षापर्यंत राहिल.
उमेदवारांनी भरतीसाठी नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र, बृहन्मुंबई महानगरपालिका, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मागे, अभिनव नगर, बोरीवली (पूर्व) मुंबई ४००० ६६ (बोरीवली (पूर्व) रेल्वे स्टेशन येथून बस क्र. ४७७ आहे.)
अधिक माहितीसाठी जाहिरात पाहण्यासाठी मुंबई पालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
उमेदवारांने करावयाचा अर्ज
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.