मुंबई आरोग्य विभागात ४३ पदांसाठी भरती

मुंबई महानगर पालिकेच्या 'सार्वजनिक आरोग्य खाते' या विभागाच्या आस्थापनेवरील 'अंशकालिक दंतशल्य चिकित्सक' या संवर्गातील एकून ४३ पदे भरण्यात येणार आहे.

Updated: Apr 1, 2016, 01:50 PM IST

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या 'सार्वजनिक आरोग्य खाते' या विभागाच्या आस्थापनेवरील 'अंशकालिक दंतशल्य चिकित्सक' या संवर्गातील एकून ४३ पदे भरण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी वैयक्तिक माहितीपत्रासह तसेच सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रतींसह अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पात्र उमेदवारांनी कार्यकारी आरोग्य अधिकारी, ३ मजला, एफ, दक्षिण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई ४०००१२ येथे अर्ज  पाठवावा तसेच दि. २-०४-२०१६ ते ११-०४-२०१६ या कालावधीत सकाळी १०.३० ते ५.३० या कार्यालयीन वेळेत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आलेय.

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा :