मुंबई : फेसबुकवर मैत्री करुन आपल्या मैत्रिणीला पैशासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केलेय.
अटक करण्यात आलेल्या प्रथमेश साळुंखे हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. तो रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील आहे. त्याची महिन्यापूर्वी फेसबुकवर एका मुलीबरोबर मैत्री झाली. ही मुलगी कांदिवलीतील चारकोप येथील असून तिला प्रथमेशने ब्लॅकमेल करण्यासाठी तुझे अश्लील फोटो अपलोड करण्याची धमकी दिली. तो एवढ्यावर न थांबता ७ हजार रुपयांची मागणी केली.
घाबरलेल्या तरुणींने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. त्यानंतर वडिलांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याचा शोध घेत प्रथमेशला अटक केली.
प्रथमेशने फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणीची माहिती मिळवली. त्यानंतर त्यांने तिला धमकविण्यास सुरुवात केली. तिच्याबद्दल मिळालेल्या माहितीनंतर त्या माहितीचा त्यांने गैरवापर करण्याचा प्रयत्न केला. तुझे अश्लील फोटो इंटरनेटवर अपलोड करीन. अन्यथा मला ७ हजार रुपये दे, अशी त्याने मागणी केली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.