स्त्रियांवर ऑनलाईन टीका करणारे पुरुष वैयक्तिक आयुष्यात 'लुजर्स'

नुकतंच झालेल्या एका संशोधनात स्त्रियांवर ऑनलाईन अश्लील टीका टिप्पणी का होते? याबद्दल एक संशोधन करण्यात आलं. यामध्ये, जे निष्कर्ष समोर आले ते नक्कीच विचार करण्याजोगे आहेत. 

Updated: Jul 24, 2015, 08:53 PM IST
स्त्रियांवर ऑनलाईन टीका करणारे पुरुष वैयक्तिक आयुष्यात 'लुजर्स'  title=

मुंबई : नुकतंच झालेल्या एका संशोधनात स्त्रियांवर ऑनलाईन अश्लील टीका टिप्पणी का होते? याबद्दल एक संशोधन करण्यात आलं. यामध्ये, जे निष्कर्ष समोर आले ते नक्कीच विचार करण्याजोगे आहेत. 

स्त्रियांवर ऑनलाईन पद्धतीनं छेडणारे किंवा त्यांच्यावर टीका-टिप्पणी करणारे पुरुष आपल्या आयुष्यात 'लुजर्स' म्हजणेच अपयशी असतात. या पुरुषांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्या असतात, असं या संशोधनातून समोर आलंय.

'युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स'चे मायकल कसुमोव्हिक आणि 'मियामी युनिव्हर्सिटी'चे जेफरी कुझेन्कॉफ यांनी हे आपल्या संशोधनातून समोर मांडलंय.


समोर आलेले निष्कर्ष

यासाठी त्यांनी काही पुरुष आणि स्त्रियांना घेऊन काही व्हिडिओगेम 'हलो 3'चे 163 राऊंड खेळले. गेम सुरू असताना या खेळाडूंनी दिलेल्या कमेंटसवर त्यांनी सतत लक्ष ठेवलं. 

यामध्ये सहभागी झालेल्या स्त्री-पुरुष वेगवेगळ्या स्तरांतील होते. तरीही खेळताना पुरुष एकमेकांबद्दल चांगल्या पद्धतीनं प्रतिक्रिया देत होते. जे पुरुष व्हिडिओ गेममध्ये चांगल्या पद्धतीनं खेळत होते ते आपल्या पुरुष आणि स्त्री सहकाऱ्यांचंही कौतुक करत होते. 

परंतु, जे पुरुष गेममध्ये मागे होते ते मात्र आपल्या स्त्री सहकाऱ्यांबद्दल लैंगिक आणि घृणास्पद कमेंट करताना दिसले. त्यामुळेच 'लुजर्स' पुरुष आपल्या स्त्री सहकाऱ्यांबद्दल चुकीची टीकाटीप्पणी करतात, असा निष्कर्ष काढण्यात आला. 

परंतु तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या जगात एव्हढंच संशोधन पुरेसं नाही. या ऑनलाईन जगात जवळपास 40 टक्के इंटरनेट युझर्स मग ते स्त्री असो किंवा पुरुष... छळवणुकीला बळी पडतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.