मुंबई : भारतीय बाजारात ‘गुगल अँन्ड्रॉईड वन’ सीरिजच्या स्मार्टफोन्सला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळालाय. यश मिळालं तर प्रतिस्पर्धी तर बाजारात तयार होणारच... तसाच प्रतिस्पर्धी आता गुगललाही मिळालाय... तो आहे इंटेक्स...
‘इंटेक्स’नं भारतातील सर्वात स्वस्त अँन्ड्रॉईड किटकॅट स्मार्टफोन लॉन्च केलाय. इंटेक्स अॅक्वा टी-२ची किंमत २६९९ रुपये इतकी निर्धारित करण्यात आलीय.
आत्तापर्यंतचा सर्वात स्वस्त अँन्ड्रॉईड फोन सेलकॉन कंपनीकडून २९९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. ‘कॅम्पस ए३५के’ हा अँन्ड्रॉईड किटकॅट स्मार्टफोन आहे.
इंटेक्सनं काही दिवसांपूर्वी फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणारा भारतातला सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘क्लाऊड एफएक्स’ लॉन्च केला होता. इंटेक्सचा स्पीड पाहता, या कंपनीची स्ट्रॅटर्जी अल्ट्रा-लो बजेट ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याची दिसतेय.
सध्या, बाजारात सेलकॉन, व्हिडिओकॉन, स्पाईस आणि इंटेक्स या सगल्याच भारतीय कंपन्यांचे हॅडसेट अल्ट्रा-लो बजटमध्ये उपलब्ध आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.