www.24taas.com, मुंबई
म्युझिक हि थीम केंद्रस्थानी ठेवून आणि नेहमीप्रमाणेच सामाजिक भान राखत ` युवा पिढी मधील ताण -तणाव ` या सामाजिक विषयावर भर देत कीर्ती कॉलेज च्या मास मिडिया विभागाच्या `मोक्ष` फेस्टिवल मध्ये विविध स्पर्धा , चर्चासत्रे आणि वर्कशॉप्स चे अयोजन १४ , १५ , १६ जानेवारी करण्यात आले आहे.
junk instrument अर्थात ` रेझ द वेस्ट ` या स्पर्धेत विविध रोजच्या वापरातला साहित्य देण्यात येईल आणि त्यातून संगीत निर्मिती करायची आहे . short film - रील टू व्हील ` या स्पर्धेत ८ ते १० मिनिटांचा लघुपट सादर करायचा असून त्याला विषयाचे बंधन नाही. fashion show (वॉक द फेम ) आणि डान्स ( ग्रूव्ह टू द बीट्स ) या स्पर्धांमध्ये कोणतेही एक वाद्य घेऊन त्याच्या सहाय्याने सुंदर कलाकृती निर्माण करायची आहे.
म्युझिक band (band -o -mast ) हे फेस्टिवल चे मुख्य आकर्षण असून `स्ट्रेस कि band बजाओ ` हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवून सादरीकरण करायचे आहे. तसेच या सोबत डिबेट ,ग्राफिटी ,क्विझ , ट्रेजर हंट, ad -mad यासारख्या उत्कंठावर्धक स्पर्धा देखील असतील. तसेच सवलतीत आणि विविध आकारात tattoos देखील काढून मिळतील,
मानसोपचार तज्ञ आणि स्ट्रेस management expert डॉ मिलिंद जोशी विद्यार्थांना मार्गदर्शन करतील. तसेच कॉमेडी express फेम अभिनेता अंशुमन विचारे वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी खास उपस्थित राहणार आहे.