महाराष्ट्र ग्रामीण बँकेत नोकरीची संधी

महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं (एमजीबी) नुकतीच नोकरीची घोषणा केलीय. अधिकारी आणि ऑफिस असिस्टंटच्या पोस्टसाठी एकूण ३१५ नोकऱ्या बँकेनं जाहीर केल्या आहेत. ज्या उमेदवारांनी सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३मध्ये झालेली आयबीपीएस आरआरबीची परिक्षा उत्तीर्ण केली असेल, ते या नोकरीसाठी पात्र उमेदवार असतील.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 3, 2013, 05:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं (एमजीबी) नुकतीच नोकरीची घोषणा केलीय. अधिकारी आणि ऑफिस असिस्टंटच्या पोस्टसाठी एकूण ३१५ नोकऱ्या बँकेनं जाहीर केल्या आहेत. ज्या उमेदवारांनी सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३मध्ये झालेली आयबीपीएस आरआरबीची परिक्षा उत्तीर्ण केली असेल, ते या नोकरीसाठी पात्र उमेदवार असतील.
१२ डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करु शकता. २७ नोव्हेंबरपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली असून १२ डिसेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन करता येईल.
आयबीपीएस स्कोअर कार्ड
> ऑफिस असिस्टंट पोस्टसाठी – ८८ मार्क पेक्षा अधिक (एससी/एसटी) आणि ९५ पेक्षा अधिक मार्क्स अन्यसाठी आवश्यक
> ऑफिसर स्केल- १ – ९५ आणि पेक्षा मार्क (एससी/एसटी) आणि ९८ पेक्षा अधिक मार्क्स अन्यसाठी आवश्यक
> ऑफिसर स्केल- २ – १०१ आणि पेक्षा मार्क (एससी/एसटी) आणि १०७ पेक्षा अधिक मार्क्स अन्यसाठी
आवश्यक
> ऑफिसर स्केल- ३ – १०३ आणि पेक्षा मार्क (एससी/एसटी) आणि १०९ पेक्षा अधिक मार्क्स अन्यसाठी
आवश्यक
निवड प्रक्रिया
> निवड प्रक्रिया ही आरआरबीच्या सामायिक लेखी परिक्षेच्या गुणसंख्येवर आधारीत आहे. त्यानंतर अर्ज केलेल्या उमेदवारांची मुलाखत औरंगाबाद इथं घेण्यात येईल.
> इतर महत्त्वाच्या माहितीसाठी बँकेकडून आलेलं नोटीफिकेशन पाहावं.
अर्ज करण्याची पद्धत
> इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जावून आयबीपीएस आरआरबीच्या परिक्षेचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून आपलं नाव नोंदवावं.
> त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरावा आणि त्याच्या पावतीचं प्रिन्ट पुढील उपयोगासाठी काढून ठेवावं.
> मुलाखतीला येतांना उमेदवारानं आपली सर्व मुळ कागदपत्र आणि सर्टिफिकेट्स सोबत आणावीत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.