न्यूयॉर्क : मोबाइलवर अधिक वेगाने बातम्या आणि विशेष लेख पाहता येण्यासाठी, फेसबुकने 'इन्स्टंट आर्टिकल' हे नवं फीचर लाँच केलं आहे.
फेसबुकवर अनेक बातम्या येतात, मात्र, लिंक ओपन करण्यात वेळ जातो, याचाच विचार करुन फेसबुकने आपलं 'इन्स्टंट आर्टिकल' हे नवं फीचर लाँच केलं असल्याचं सांगण्यात येतंय.
लिंक ओपन करण्यासाठी लागणारा वेळ आता वाचणार आहे, कारण 'इन्स्टंट आर्टिकल' फीचरमुळे ही लिंक त्वरीत ओपन होईल. तसेच लेखासंबंधी असणारे हाय-रेझ्युलेशन फोटोही झटपट पाहता येतील. याशिवाय व्हिडिओही पाहता येतील.
यावर बोलकांना फेसबुकचे मुख्य प्रोडक्ट अधिकारी ख्रिस कोक्स म्हणाले, "या फीचरच्या माध्यामातून फेसबुकवरील आपल्या वाचकांना चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न पब्लिशर्स करीत आहेत."
मात्र, सध्या हे फिचर टेस्टिंगसाठी आयफोनवर देण्यात आलं असून युजर्सकडून यासंबंधी प्रतिक्रिया मागविण्यात येणार आहेत.
सध्या फेसबूकने नऊ पब्लिशर्सच्या साथीने हे फीचर सुरु केले आहे. तूर्तास इन्स्टंट आर्टिकल हे फिचर आयफोन फेसबुक युजर्ससाठी तयार करण्यात आलं असून त्यांना न्यूयॉर्क टाइम्स, बझ फीड, नॅशनल जिओग्राफीक, एनबीसी, द अटलांटिक आणि इतर पब्लिशर्सच्या बातम्या पाहता येणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.