दिवसातून तीन तासांपेक्षा जास्त वेळ 'स्मार्टफोन'ला!

जवळपास 25 टक्के उपभोक्ते आपला फोन दिवसातून 100 हून अधिक वेळा तपासून पाहतात. मंगळवारी समोर आलेल्या एका अभ्यासात ही गोष्ट समोर आलीय. 

Updated: Jul 23, 2014, 03:34 PM IST
दिवसातून तीन तासांपेक्षा जास्त वेळ 'स्मार्टफोन'ला! title=
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : भारतीय उपभोक्ते दिवसातील जवळजवळ तीन तास वेळ केवळ आपल्या स्मार्टफोनला देतात. जवळपास 25 टक्के उपभोक्ते आपला फोन दिवसातून 100 हून अधिक वेळा तपासून पाहतात. मंगळवारी समोर आलेल्या एका अभ्यासात ही गोष्ट समोर आलीय. 

एप्रिल-जून 2014 मध्ये भारतातील 18 शहरांतील 4000 स्मार्टफोन उपभोक्यांवर हा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर काढण्यात आलेल्या निष्कर्षात, गेल्या दोन वर्षांच्या काळात भारतात ‘अॅप्लिकेशन्स’च्या वापरात 57 टक्क्यांनी वाढ झाल्याचं सांगण्यात आलंय. तसंच, स्मार्टफोनवर उपभोक्त्यांकडून दिल्या जाणाऱ्या वेळेतही 20 टक्क्यांनी वाढ झालेली यावेळी दिसली. स्मार्टफोनवर खर्च केलेल्या वेळेचा एक-तृतियांश भाग ‘अॅप्लिकेशन्स’साठी वापरण्यात येतो आणि हा ट्रेन्ड कायम राहण्याची शक्यता आहे. 

या अभ्यासात म्हटल्यानुसार, बहुतेक नवीन उपभोक्त्यांमध्ये सोशल आणि चॅट अॅप्लिकेशन्ससाठी स्मार्टफोन खरेदी करण्याचा ट्रेन्ड दिसून येतो. 40 टक्के परिपक्व स्मार्टफोन उपभोक्तांच्या म्हणण्यानुसार, आता ते सामाजित उद्देशांसाठी स्मार्टफोनचा उपयोग करत नाही. कमीत कमी 24 टक्के स्मार्टफोन उपयोगकर्ते व्हाटस अप आणि वी चॅट यांसारख्या अॅप्सचा वापर आपल्या उद्योगधंदा वाढवण्यासाठी करतात. नव्या उपभोक्त्यांपर्यंत पोहचण्यासाठी तसंच आपली उत्पादनं आणि सेवा विकण्यासाठी ते याचा वापर करतात.   

एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘मोबाईल ब्रॉडबँन्ड बिहेवियर’मध्ये परिपक्तता हाही यातील एक महत्त्वाचा भाग आहे. परिपक्व उपयोगकर्ते नव्या उपयोगकर्त्यांच्या तुलनेत दुप्पट डेटा वापरतात. आपल्या आवडी-निवडी आणि गरजांसाठी उपयोगकर्ते नवनवे अॅप्लिकेशन्स शोधत असतात. त्यामुळे मोबाईल ब्रॉडबॅन्डचा वापरही वाढतोय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.