मुंबई : गूगल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर राजन आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 पर्यंत भारतात 50 कोटी इंटरनेट युझर्स असतील. तसेच या वर्षाच्या शेवटी सर्वात जास्त इंटरनेट युझर्स हे भारतात असतील, ते अमेरिकेपेक्षाही जास्त असणार आहेत.
आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार राजन आनंद यांनी फिक्कीने आयोजित केलेला कार्यक्रम डिजिटायझिंग इंडियात बोलतांना सांगितलं भारतात इंटरनेटचा सध्याचा होत असलेला विस्तार पाहिला तर, भारतात 2018 मध्ये 50 कोटी युझर्स असतील.
या वर्षाच्या शेवटी सर्वात जास्त इंटरनेट युझर्स हे भारतात असतील, ते अमेरिकेपेक्षाही जास्त असणार आहेत.
जागतिक बँकेकडून 2013 चा एक रिपोर्ट आला आहे, त्या रिपोर्टनुसार 84.2 टक्के अमरिकेन म्हणजे 27 कोटी लोक ऑनलाईन आहेत. ही संख्य़ा भारताच्या संख्येच्या मानाने 15 टक्के आहे. ट्रायने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार भारतात 24 कोटी इंटरनेट युझर्स आहेत.
राजन आनंद म्हणतात, भारतात इंटरनेट युझर्सची संख्या 1 कोटीपर्यंत वाढण्यासाठी 10 वर्ष लागली. आता प्रत्येक महिन्य़ात 50 लाख युझर्स वाढतायत.
इंटरनेटच्या प्रसारात स्वस्त स्मार्टफोन्सनेही महत्वाची भूमिका बजावली आहे. बाजारात अडीच ते तीन हजाराचे एंड्रॉएड मोबाईल फोन खरेदी केले जात आहेत. तर इंटरनेटशी संबंधित फीचर असलेले मोबाईलही हजारात उपलब्ध आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.