अॅपल आणि सॅमसंगच्या स्पर्धेत ग्राहकांचा फायदा

अॅपल आणि सॅमसंग या आघाडीच्या फोन कंपमन्यामध्ये आता स्मार्टफोनच्या किंमतीवरून लढाई सुरु झाली आहे. भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्या आता त्यांच्या स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात करत आहेत.

Updated: Mar 29, 2015, 02:48 PM IST
अॅपल आणि सॅमसंगच्या स्पर्धेत ग्राहकांचा फायदा title=

मुंबई : अॅपल आणि सॅमसंग या आघाडीच्या फोन कंपमन्यामध्ये आता स्मार्टफोनच्या किंमतीवरून लढाई सुरु झाली आहे. भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्या आता त्यांच्या स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात करत आहेत.

ऑनलाईन रिटेलर अमेझॉन इंडियाच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, अॅपलने आयफोन 5Cच्या दरात तब्बल 30 टक्के कपात केली आहे. तर दुसरीकडे याच वेबसाईटवर सॅमसंगने त्यांच्या लोकप्रिय गॅलेक्सी S4ची किंमत 23 टक्क्यांनी कमी केली आहे. 

अॅपलला टक्कर देण्यासाठी सॅमसंग गॅलेक्सी S4ची किंमत कमी करुन 17,999 रुपये केली आहे. त्याला उत्तर म्हणून अॅपलने आयफोन 5C च्या दरात कपात केली असून आता हा फोन 22,990 रुपयांत उपलब्ध आहे. यासाठी ग्राहकांना अमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवरुन स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. कारण अॅपल आणि सॅमसंग या दोन्ही कंपन्यांनी आयफोन 5C आणि सॅमसंग S4ची विक्री रिटेलच्या माध्यमातून बंद केली आहे.

त्यामुळे 'दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ' म्हणीनुसार अॅपल आणि सॅमसंगच्या भांडणात ग्राहकांचा फायदा होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.