विधानसभेआधी देवीच्या चरणी राहुल, मोदी! कोणत्या नेत्याला देवी पावणार?

Assembley Election: पंतप्रधान मोदी, राहुल गांधी या दौऱ्यात प्रचाराचा नारळच वाढवला जाणार आहे. आता दोघांपैकी कोणत्या नेत्याला देवी पावते हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

Updated: Oct 4, 2024, 09:34 PM IST
विधानसभेआधी देवीच्या चरणी राहुल, मोदी! कोणत्या नेत्याला देवी पावणार? title=
विधानसभेआधी देवीच्या चरणी राहुल, मोदी!

गणेश मोहाळेसह प्रताप नाईक, झी 24 तास कोल्हापूर: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचेही महाराष्ट्र दौरे वाढलेत. नवरात्रोत्सव सुरु असतानाच मोदी पोहरादेवीला आणि राहुल गांधी अंबाबाईच्या कोल्हापुरात येतायत. दोघांच्या या दौऱ्यात प्रचाराचा नारळच वाढवला जाणार आहे. आता दोघांपैकी कोणत्या नेत्याला देवी पावते हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

पोहरादेवी देवस्थानाकडून मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींचे महाराष्ट्र दौरे वाढलेत. नवरात्रोत्सवात राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी देवींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. मोदींचा पुणे दौरा पावसात वाहून गेल्यानंतर ते बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवीत येणार आहेत. तिथं नंगारा म्युझियमचं लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी पोहरादेवीत महायुतीच्या प्रचाराचा नारळच वाढवणार असल्याचं सांगण्यात येतंय. पोहरादेवी देवस्थानानं मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी केलीय.

गांधींचा कोल्हापूर दौरा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी

राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा खास असणार आहे. कारण तब्बल 14 वर्षानंतर राहुल गांधी कोल्हापुरात येणार आहेत. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राहुल गांधींच्या हस्ते होणार आहे. राहुल गांधी शारदीय नवरात्रोत्सावात कोल्हापुरात येणार असल्यानं ते अंबाबाईच्या दर्शनाला जातात का याची उत्सुकता असणार आहे. राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं काँग्रेस नेते सांगतात.

 निवडणुकीत कोणती देवी कोणत्या नेत्याला पावते?

नवरात्रोत्सवात गांधी-मोदींचा कोल्हापूर आणि पोहरादेवी दौरा होतोय. आता निवडणुकीत कोणती देवी कोणत्या नेत्याला पावते, कोणाच्या पदरात विजयश्री टाकते, याची उत्सुकता निर्माण झालीय.