Mumbai Local News Today: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याचा विचार करताय. तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)वरुन सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तसंच, लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने चालवण्यात येणार आहेत.
पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्थानकादरम्यान हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 या कालावधीत ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. या काळात सीएसएमटी-वाशी हार्बर मार्गावर विशेष सेवा असणार असून ठाणे-वाशी/ नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकादरम्यान पोर्ट लाइन सेवा चालवण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर देखील 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मार्गावरुन पनवेल-बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल तसंच, पनवेल ठाणे दरम्यानच्या ट्रान्सहार्बर मार्गावरील दोन्ही दिशेच्या सेवा बंद राहणार आहेत. तसंच, बेलापूर-उरण आणि नेरूळ-उरण सेवा मात्र सुरू राहणार आहेत. गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पाचव्या मार्गिकेवर शनिवारी रात्री 11 ते रविवारी सकाळी 9 पर्यंत 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.