मुंबई: हा स्मार्टफोनचा जमाना आहे. आता जवळपास सगळ्यांकडेच स्मार्टफोन असतो. आपल्या फोनमधील वैयक्तिक बाबी इतरांनी बघू नये म्हणून आपण फोन विविध प्रकारच्या लॉक्स अॅपने लॉक केलेला असतो. पण एखादी दुर्घटना घडली तर...
आणखी वाचा - व्हॉट्स अॅपमधील हा नवा बदल तुम्ही पाहिला!
आपला फोन लॉक आहे आणि अपघात घडला तर एखाद्या व्यक्तीनं आपल्या कुटुंबियांना किंवा मित्रांना संपर्क कसा साधायचा, हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो.
पण घाबरू नका यावर एक उपाय आहे, जर जवळपास अनेक जण अँड्रॉइड फोन वापरतात. आपल्या स्मार्टफोनमध्ये आपलं नाव आणि इनर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर टाकून ठेवा... तो कसा ते पाहा...
आणखी वाचा - सावधान! आपला पॅटर्न लॉक सेफ नाही
आपल्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जा, त्यात सिक्युरिटीमध्ये लॉक स्क्रीन ऑप्शन असेल, त्यात ओनर इन्फोमध्ये आपली माहिती भरा...
(settings ->security-> lock screen-> owners info.)
असं केल्यानंतर आपला फोन लॉक असला तरी मोबाईल स्क्रीनवर सतत आपली माहिती येत राहील. तेव्हा याचा नक्की वापर करा...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.