ICMR आणि शासकीय मुद्रणमध्ये २४२ रिक्त जागा भरणार

राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था पुणे येथे विविध पदांच्या ३२ जागांगरिता तर शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाश संचालनालयांतर्गत विविध पदाच्या २१० रिक्त जागा अशा एकूण २४२ जागा भरण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Updated: Feb 6, 2015, 08:53 PM IST
ICMR आणि शासकीय मुद्रणमध्ये २४२ रिक्त जागा भरणार title=

मुंबई : राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था पुणे येथे विविध पदांच्या ३२ जागांगरिता तर शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाश संचालनालयांतर्गत विविध पदाच्या २१० रिक्त जागा अशा एकूण २४२ जागा भरण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ICMR पुणे विविध पदाच्या ३२ जागा
राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था पुणे येथे विविध पदांच्या ३२ जागांगरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ फेब्रुवारी २०१५ आहे. अधिक माहिती WWW.icmr.nic.in

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाश संचालनालयांतर्गत  २१० जागा
शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाश संचालनालय यांच्या अधिपत्याखालील व्यवस्थापक, शासकीय मध्यवर्ती कार्यालय मुंबईमध्ये परिचर प्रतिरुप (२७ जागा) बांधणी सहाय्यकारी (४६), मूळप्रत वाचक ९१२), सहाय्यक यांत्रिक (१), तसेच पुणे येथील कार्यालयामध्ये अनुरेखक (३), परिचर प्रतिरुप (२४), बांधणी सहाय्यकारी (३०), अस्तरणीकार (१२), 

येरवडा कारागृह मुद्रणालय, पुणे येथे लिपिक टंकलेखन (१), प्रक्रिया सहाय्यक (१), परिचर प्रतिरुप (४), बांधणी सहाय्यकारी (१), 

शारकीय मुद्रणालय व ग्रथगार, नागपूर येथे लिपिक टंकलेखक (३), सामग्री परिचर (१), बांधणी सहाय्यकारी (१०), कनिष्ठ सुतार (१), वरिष्ठ लिपिक (३), मूळ प्रत वाचक (१०), परिचर प्रतिरुप (१२), 

शासकीय मुद्रणालय, वाई येथे कनिष्ठ सुतार (१), शासकीय मुद्रणालय औरंगाबाद येथे लिपिक टंकलेखक (१), साहयक संचालक, शासकीय लेखनसामग्री भांडार, नागपूर येथे लिपिक टंकलेखक (२), व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार, कोल्हापूर येथे बांधणी सहाय्यकारी (४) आदी पदे रिक्त आहेत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ फेब्रुवारी २०१५ आहे. अधिक माहितीसाठी https://maharecuitment.mahaonline.gov.in/MR/MaharecuitmentMainPage.aspx

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.