न्यू यॉर्कः तायवानमधील एचटीसी कंपनीच्या गॅजेट विक्रीत सतत घसरण होत होती. ही घसरण थांबविण्यासाठी तरूणाईमधील सेल्फी वेड कॅश करून त्यांनी ‘वॉटर प्रूफ’ सेल्फी कॅमेरा आणि सेल्फी स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
हा कॅमेरा १९९ डॉलर किंमतीचा असून ‘री कॅमेरा’असून याचा आकार नळासारखा आहे. या कॅमेराला तुम्ही सायकलच्या हॅन्डलवर सुद्धा लावू शकता.
गतवर्षी सॅमसंगच्या जबरदस्त स्पर्धेमुळे एचटीसी कंपनीचा ब्रँन्ड कमकुवत झाला होता. जगातील स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपनीच्या यादीतून देखील हा ब्रँन्ड बाहेर गेला होता.
तीन महिन्यामध्ये पुन्हा ही कंपनी मैदानात येत आहे. यामुळे याची विक्री वाढण्यास मदत होणार आहे, असे कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी चियालिन चॅन्ग यांनी असा विश्वास दर्शविला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.