तुमचा नंबर #RelianceJio वर पोर्ट कसा कराल? पाहा...

गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ मोबाईल फोन नेटवर्कवर डेटा किंमती सादर करून एकप्रकारे टेलीकॉम सेक्टरमध्ये क्रांतीच आणलीय. 

Updated: Sep 2, 2016, 10:19 PM IST
तुमचा नंबर #RelianceJio वर पोर्ट कसा कराल? पाहा...  title=

नवी दिल्ली : गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ मोबाईल फोन नेटवर्कवर डेटा किंमती सादर करून एकप्रकारे टेलीकॉम सेक्टरमध्ये क्रांतीच आणलीय. 

यापूर्वी जिओ सिम केवळ रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांकरता उपलब्ध होतं. आता मात्र सॅमसंग आणि एलजी स्मार्टफोन युझर्सही रिलायन्सच्या डिजिटल स्टोअरमधून जिओ सिम खरेदी करू शकतात. 
 
जर तुम्हाला तुमचा सध्याचा मोबाईल क्रमांक 'जिओ'ला पोर्ट करायचा असेल तर तुम्ही 'मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी'चा (MNP) वापर करू शकता. याद्वारे, तुमचा सध्याचा मोबाईल क्रमांक न बदलता तुम्ही तुमची सध्याची मोबाईल कंपनी बदलून जिओ कंपनीची सुविधा वापरू शकता. 

मोबाईल पोर्टेबिलिटीसाठी...

तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक न बदलता पोर्ट सुविधेसाठी <port> <space> <mobile number> टाईप करून १९०० वर पाठवा.

यानंतर तुम्हाला एक UPC म्हणजेच युनिक पोर्ट कोड १९०१ या नंबरहून एसएमएसद्वारे पाठवला जाईल. हा १५ दिवसांसाधी वैध असतो. हा कोड मिळाल्यानंतर तुम्ही तुमचा नंबर रिलायन्समध्ये बदलण्यासाठी तयार असाल. 

यानंतर तुम्ही कोणत्याही रिलायन्स मोबाईल स्टोअर / रिलायन्स वर्ल्ड किंवा रिटेलरकडे जाऊन ग्राहक विनंती अर्ज (CAF) भरू शकता.

यासाठी तुम्हाला राहण्याचा पत्ता, ओळखपत्र आणि एक फोटो अशी कागदपत्रं सादर करावी लागतील. 

यानंतर रिलायन्सकडून तुम्हाला एक नवीन सिमकार्ड मिळेल. सहा दिवसांपर्यंत तुम्ही तुमचं जुनं सिम काढून रिलायन्सचं नवं सिमकार्ड वापरणं सुरू करू शकाल. 

टीप : ही सुविधा अद्याप सुरू झालेली नाही. अर्ज करण्यापूर्वी एमएनपीसाठी पात्रतेची चौकशी करून घ्यावी.