मुंबई : सुरुवातील सिंगल सिमचा मोबाईल होता त्यावेळी नंबर लक्षात राहायचा. मात्र, आता स्मार्टफोनमुळे दोन सिम असल्याकारणाने नंबर दोन असतात. अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर देत असतात. त्यामुळे साहजिक काहीजण दोन पेक्षा जास्त नंबर ठेवतात. मात्र, ज्यावेळी एकाद्याला नंबर द्यायचा असतो किंवा रिचार्ज करावयाचा असतो त्यावेळी नंबर लक्षात नसतो. त्यामुळे आपली अडचण वाढते. मात्र, याची तुम्ही चिंता करु नका. खालील कोड वापरुन तुम्ही तुमचा नंबर शोधू शकता.
1. Airtel - *121*9#
2. Vodafone - *111*2#
3. BSNL - *222#
4. Idea - *1#
5. Reliance - *1#
6. Aircel - *1#
7. Uninor - *555#
हे सर्व नंबर आपल्या मोबाईलवर डायल करा आणि त्यानंतर OK बटन दावा. तुम्हाला तुमचा मोबाईल स्क्रीनवर मोबाईल नंबर दिसेल.