सुंदर पिचाई ठरले अमेरिकेतली सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ

मूळ भारतीय वंशाचे 'गूगल'चे सीईओ सुंदर पिचाई अमेरिकेतील सर्वात जास्त कमाई करणारे सीईओ बनलेत. 

Updated: Feb 9, 2016, 12:34 PM IST
सुंदर पिचाई ठरले अमेरिकेतली सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ title=

न्यूयॉर्क : मूळ भारतीय वंशाचे 'गूगल'चे सीईओ सुंदर पिचाई अमेरिकेतील सर्वात जास्त कमाई करणारे सीईओ बनलेत. 

आपल्या बुद्धीकौशल्यानं सुंदर पिचाई यांना भल्याभल्यांना भूरळ पाडलीय. याचमुळे, 'अल्फाबेट इंट'नं त्यांना १९९ मिलियन डॉलरचे (म्हणजेच जवळपास १३०० करोड रुपये) काही स्टॉक शेअर्स दिलेत. 

कंपनीनं ३ फेब्रवारी रोजी पिचाई यांना हे पॅकेज दिलंय. परंतु या शेअर्ससोबत अल्फाबेट इंटनं काही अटी समोर ठेवल्यात. 

२०१९ पर्यंत पिचाई हे गूगलला आपली सेवा देणार आहेत, तेव्हापर्यंतच त्यांना या पॅकेजचा फायदा मिळेल.

सुंदर पिचाई यांना सध्या गूगल ३१० करोड रुपये वार्षिक पॅकेज देत आहे. कंपनीचे सीईओ बनल्यानंतर पिचाई यांना मिळणारा हा पहिलाच अॅवॉर्ड ठरलाय.