आता, इंटरनेटशिवाय वापरा गूगल मॅप!

गूगल मॅप आता इंटरनेटशिवायही काम करू शकणार आहे. गूगलनं बुधवारी आपल्या मॅपसाठी ऑफलाईन नेव्हिगेशन आणि सर्च फिचर देणार असल्यचं जाहीर केलंय. 

Updated: Nov 11, 2015, 11:01 PM IST
आता, इंटरनेटशिवाय वापरा गूगल मॅप!  title=

मुंबई : गूगल मॅप आता इंटरनेटशिवायही काम करू शकणार आहे. गूगलनं बुधवारी आपल्या मॅपसाठी ऑफलाईन नेव्हिगेशन आणि सर्च फिचर देणार असल्यचं जाहीर केलंय. 

यामुळे, इंटरनेटशिवाय यूझर्स नेव्हिगेशनचा वापर करू शकतील. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, हे फिचर IOS अॅप यूझर्सही वापरू शकणार आहेत. 

या फिचरमुळे यूझर्स त्यांना हव्या असलेल्या भागाचा मॅप डाऊनलोड करून आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करून ठेऊ शकतात. यामुळे, त्यांना हवं तेव्हा इंटरनेटशिवाय ते हा मॅप पुन्हा उघडून पाहू शकतील... शिवाय इंटरनेटशिवाय मॅपच्या साहाय्यानं नेव्हिगेशन करू शकतील. 

इंटरनेट कनेक्ट झाल्यानंतर हा मॅप पुन्हा एकदा लाईव्ह होईल. यामुळे यूझर्सना रिअल टाईम ट्राफिकचीही माहिती मिळेल. 
  
गूगलच्या म्हणण्यानुसार, जगातील 60 टक्क्यांहून अधिक लोकांकडे फास्ट इंटरनेट नाही. यामुळे त्यांना मॅप नॅव्हिगेट करताना अनेक समस्या येतात. गूगल मॅपच्या या ऑफलाईन नेव्हिगेशन फीचरच्या माध्यमातून लोक सहजरित्या नेव्हिगेट करू शकतील.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.