फक्त एक रुपयामध्ये मिळणार शाओमीचा स्मार्टफोन

दिवाळीनिमित्त शाओमी कंपनीनं ग्राहकांना बम्पर ऑफर दिली आहे. कंपनी रेडमी 3 एस प्राईम हा स्मार्टफोन फक्त एक रुपयाला विकणार आहे. 

Updated: Oct 16, 2016, 06:32 PM IST
फक्त एक रुपयामध्ये मिळणार शाओमीचा स्मार्टफोन title=

मुंबई : दिवाळीनिमित्त शाओमी कंपनीनं ग्राहकांना बम्पर ऑफर दिली आहे. कंपनी रेडमी 3 एस प्राईम हा स्मार्टफोन फक्त एक रुपयाला विकणार आहे. ही ऑफर 17 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या कालावधीमध्ये Mi.com/in आणि Mi Store App वर उपलब्ध राहणार आहे.

17 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता ही ऑफर सुरु होईल आणि 19 ऑक्टोबरला संपेल. एक रुपयामध्ये स्मार्टफोन हवा असेल तर ग्राहकांना Mi.com/inवर 17 ऑक्टोबरआधी रजिस्टर करून ते फेसबूक आणि ट्विटरवर शेअर करावं लागणार आहे. शाओमी दिवसाला 30 स्मार्टफोन एक रुपयामध्ये विकणार आहे.

या ऑफरचा निकाल MI कम्यूनिटीनवर प्रत्येक दिवशी घोषीत करण्यात येणार आहे. हा निकाल घोषीत झाल्यानंतर विजेत्याला दोन तासांमध्ये एक रुपया द्यावा लागणार आहे अन्यथा ही ऑर्डर रद्द करण्यात येणार आहे.