मुंबई : एखादी मुलगी तुम्हाला आवडते, तिच्यासोबत वेळ घालवायला तुम्हाला आवडते मात्र समजत नाहीये की ती तुमच्यात इंटरेस्टेड आहे की नाही तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला आवडणारी मुलगी तुमच्यात इंटरेस्टेड आहे का?...तिच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी टिप्स
1. मी रिलेशनशिपसाठी तयार नाहीये असे ती म्हणाल्यास याचा सरळ अर्थ की तिला प्रेमात इंटरेस्ट नाहीये.
2. मला वाटतं की स्वत:ला अधिक वेळ दिला पाहिजे असे म्हणत असेल तर याचा अर्थ तुमच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहण्यापेक्षा तिला सिंगल राहायला आवडेल.
3. मी तुला त्या नजरेने कधी पाहिलंच नाही याचा अर्थ तुम्ही तिच्यासाठी केवळ मित्र आहात.
4. मला नाही वाटत आता ही योग्य वेळ आहे...पुढे कधीतरी यावर विचार करु म्हणजेच तिला तुमच्याशी आता नाते जोडायचे नाहीये मात्र त्याचबरोबर तुमचा सहवास मात्र तिला हवाय.
5. तुम्हाला आवडणारी मुलगी सिंगल आहे हे तुम्हाला माहीत आहे मात्र त्यानंतरही ती म्हणत असेल की माझ्या जीवनात दुसरा कोणी आहे याचा अर्थ तिला तुमच्यात इंटरेस्ट नाही.