फ्लॅट किंवा जागा घेतांना या १० गोष्टी जाणून घ्या

घर खरेदी करण्याआधी प्रत्येकाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. अनेकदा तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी लक्षात घ्या.

Updated: Sep 15, 2016, 06:41 PM IST
फ्लॅट किंवा जागा घेतांना या १० गोष्टी जाणून घ्या title=

मुंबई : घर खरेदी करण्याआधी प्रत्येकाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. अनेकदा तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी लक्षात घ्या.

१. जमिनीचं रजिस्ट्रेशन

डेव्हलपर किंवा बिल्डरला जमिनीचं रजिस्ट्रेशन दाखवण्यास सांगा. ही गोष्ट कन्फर्म करुन घ्या की त्या जमिनीवरुन कोणताही वाद तर नाही सुरु आहे ना? बँक फक्त त्याच जमिनीवर लोन देते जी कोणत्याही वादात नसते. त्यामुळे बँक जर लोन देत असेल तर ती जागा वादात नाही हे कळू शकते पण तरी एकदा चौकशी करणं गरजेचं आहे.

२. प्रोजेक्टचा अॅप्रूव्ड लेआऊट मॅप 

बिल्डरचा हा प्रोजेक्ट किती टॉवरचा, किती फ्लॅटचा आणि किती माळ्यांचा आहे ज्याला मंजुरी देखील मिळाली आहे. ज्यावर कोणतंही ऑब्जेकशन नाही. हे त्या मॅपवरुन कळू शकतं. माहिती पुस्तिकामध्ये या गोष्टी कळत नाहीत.

३. लोकेशन आणि फ्लॅटला द्या भेट

माहिती पुस्तकात दिलेल्या फ्लॅट एरियावर विश्वास ठेवू नका. जेथे प्रोजेक्ट सुरु आहे तेथे प्रत्यक्ष जाऊन भेट द्या. तुमचा फ्लॅट आणि त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या रॉ मटेरिअल जावून पाहा. जेथे प्रोजेक्ट सुरु आहे तेथे आजुबाजुला हॉस्पिटल, स्कूल, बाजार, रेल्वे स्टेशन, बस स्टँड सारख्या गोष्टी किती लांब आहे हे प्रत्यक्षात तपासून पाहा.

४. बिल्टअप एरिया, सुपर एरिया आणि कार्पेट एरिया

ग्राहक अनेकदा फ्लॅटमध्ये लिहिलेल्या सुपर एरियाला फ्लॅटचा साईज समजतात आणि बुकींग करतात. पण फ्लॅटची जागा कमी असते. अशा वेळेत बिल्टअप, सुपर आणि कार्पेट एरियाचं गणित समजून घ्या. कारपेट एरिया त्या एरिया म्हणतात ज्यावर तुम्ही कारपेट टाकू शकता. या एरियामध्ये फ्लॅटच्या भींती मोजल्या नाही जात हे लक्षात घ्या. फ्लॅटमधली रिकामी जागा यामध्ये मोजली जाते. बिल्टअप एरियामध्ये भींती मोजल्या जातात. यामध्ये कारपेट एरिया, पिलर, भींती आणि गॅलरीची जागा मोजली जाते.

सुपर एरिया म्हणजे प्रोजेक्टमधल्या कॉमन यूजच्या जागा मोजल्या जातात. जसे की, जेनरेटर रूम, पार्क, जिम, स्वीमिंग पूल, लॉबी, टेनिस कोर्ट इत्यादी गोष्टी. बिल्डर्स फ्लॅट सुपर एरियाच्या आधारावर विकतात.

५. पजेशन टाईम
अनेक बिल्डर्स आणि डेव्हलपर प्रोजेक्ट पजेशन टाईममध्ये ६ महिन्याचा ग्रेस पीरेड देखी जोडतात. कोणत्याही ग्राहकाचं पजेशन टाईम यामुळे दो वर्षावरुन ३० महिने होऊन जातं. पजेशन डेटपासून ६ महिने उशिरा पजेशन दिल्यास डेवलपर्स यासा लेट प्रोजेक्टच्या श्रेणीमध्ये नाही टाकत. यामुळे ग्राहक बिल्डर किंवा डेवलपर्सकडून लेट पजेशनची पेनल्टी नाही चार्ज करु शकत.

६. पेनल्टी क्लॉज लक्षपूर्वक वाचा

ठरवलेल्या वेळेत प्रोजेक्ट पूर्ण न झाल्यास डेवलपर्स ग्राहकांना पेनल्टी देतात. अनेक डेव्हलपर्स पजेशनपर्यंत ग्राहकांकडून मिळणारी राशी जर उशिरा मिळत असेल तर त्यावर दंड न घेण्याचा पर्याय ठेवतात. २ वर्षात ग्राहकांकडे अनेकजा डिमांड ऑर्डर केली जाते. जर ग्राहकाकडून पेमेंट करतांना उशिर झाल्यास डेव्हलपर्स पेनल्टीसाठी भर देतात.

७. पेमेंट स्कीम लक्षात घ्या

डेव्हलपर्सकडून मोठे-मोठे ब्रँड अँबेसडर सोप्या पेमेंट प्लानसाठी ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये 10% बुकिंग अमाउंट बाकी पजेशन  12/24/42 महिन्याच्या व्याजावर सूट देतात. त्यामुळे बुकींग करतांना तुमचा फायदा बघूनच स्किम निवडा आणि ती व्यवस्थित समजून घ्या.

८. हिडन चार्जेस 

बुकिंग करतांना अनेक प्रकारच्या चार्जेसचा उल्लेख करणं टाळतात. बुकिंग एजेंटकडून त्या गोष्टी लपवल्या जातात. हिडन चार्जेसमध्ये पार्किंग चार्ज, सोसाइटी चार्ज, पावर बॅकअप यासारख्या चार्जेसचा समावेश आहे. हे सगळे चार्ज बुकिंग करतांना समजून घ्या.

९. डेव्हलपरची माहिती 
ज्या डेव्हलपर किंवा बिल्डरकडून तुम्ही फ्लॅट घेणार आहात त्याच्या आधीच्या प्रोजेक्टची माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. त्याने केलेले आधीचे प्रोजेक्ट, कंस्ट्रक्शन क्वालिटी, पजेशन वेळ, बिल्डरचं परफॉर्मेंस यासारख्या गोष्टी समजून घ्या.

१०. एक्सक्लेशन फ्री असावा फ्लॅट रेट

अनेकदा डेव्हलपर प्रोजेक्टवर एक्सक्लेशन चार्जेस लावतात. जसे की, सिमेंट, कच्चा मालाच्या किंमती वाढल्यास डेव्हलपर ग्राहकांच्या फ्लॅटची किंमत वाढवतो. त्यामुळे बुकिंग करतांना हे विचारुन घ्या की फ्लॅटवर एक्सक्लेशन चार्ज नाही आहेत ना.