आता फेसबुकवरील नको असलेल्या पोस्टपासून होणार सुटका

आपल्याला फेसबुकवर नको असलेल्या पोस्ट आणि स्टेटस अपडेट्सपासून सुटका करायचीय. आपल्याला फेसबुकवर अनेक जणांकडून टाकलेल्या वेगवेगळ्या पोस्ट पाहण्याचा त्रास होतो. 

Updated: Nov 10, 2014, 09:23 PM IST
आता फेसबुकवरील नको असलेल्या पोस्टपासून होणार सुटका title=

नवी दिल्ली: आपल्याला फेसबुकवर नको असलेल्या पोस्ट आणि स्टेटस अपडेट्सपासून सुटका करायचीय. आपल्याला फेसबुकवर अनेक जणांकडून टाकलेल्या वेगवेगळ्या पोस्ट पाहण्याचा त्रास होतो. 

जर आपण त्यांना अनफ्रेंड न करता समोरून येणारे अपडेट्स बंद करू शकलात तर. हो हे शक्य आहे. याचा पर्याय आता फेसबुकनं दिलाय. फेसबुकनं युजर्सला आपल्या न्यूज फीडवर जास्त कंट्रोल असलेलं फीचर दिलंय. 

फेसबुकनं दिलेल्या या नव्या फीचरमधील या फीचरचं नाव ‘see less’ कमी पाहा असं आहे. पहिले जेव्हा आपण आपल्या फीडमध्ये कोणत्या स्टोरीवर क्लिक करत होतात, तेव्हा त्या फ्रेंडकडून आपल्याला अपडेट्स दिसू नये, असं ऑप्शन होतं. मात्र आता त्या मित्राकडून तुम्हाला कमी अपडेट्स दिसतील, असं ऑप्शन दिसेल. आपल्याला हे ऑप्शन तेव्हा दिसेल, जेव्हा कोणत्याही पोस्टच्या वर उजव्या बाजूला कॉर्नरमध्ये बटनवर क्लिककरून ती पोस्ट तुम्ही ‘हाईड’ कराल. 

जेव्हा आपण त्या फ्रेंडकडून कमी अपडेट्स दिसण्याचं ऑप्शन निवडाल. तेव्हा आपल्याला हे ऑप्शन दिसेल की जर आपण त्यांची कोणती स्टोरी आपल्या वॉलवर पाहू इच्छित नाही, तर त्यांना अनफॉलो करून टाका. याशिवाय मागील आठवड्यात तुमच्या न्यूज फीडमध्ये जास्त दिसलेले लोकं, पेज आणि ग्रुपवर आपल्याला न्यूज फीडच्या सेटिंगमध्ये दिसेल. जर आपण त्यांची स्टोरी आपल्या न्यूज फीडमध्ये दिसू नये असं वाटतं, तर त्यांना अनफॉलो करण्याचं ऑप्शन असेल. 

आपण आपल्या न्यूज फीड सेटिंग्जमध्ये नेहमी आपण कोणाला अनफॉलो केलंय आणि त्यांना पुन्हा फॉलो करू शकाल का? हे ऑप्शन तिथंच राहिल, ते पाहू शकाल. हे नवं फीचस हळुहळू डेस्कटॉप आणि मोबाइल युजर्सला दिलं जात आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.