मुंबई : तुमची वरील हेडलाईनने दिशाभूल झाली असेल, तर आम्हाला माफ करा, पण आम्ही ही बातमी तुमच्या सुरक्षिततेसाठी देत आहोत, कारण नुकतंच फेसबुकने अनलाईक बटन लावणार असल्याचे जाहीर केले आहे.
हे नीट लक्षात ठेवा, नाहीतर तुमचा कम्प्युटर किंवा फेसबुक अकाऊंट हॅक होईल
Get Facebook Dislike Button म्हणजेच फेसबुकच डिसलाईक बटन मिळवा, असं इंग्रजीत लिहिलेला मेसेज आला, किंवा कुणाच्या वॉलवर दिसला तर त्यावर क्लिक करू नका, कारण त्या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमचं फेसबुक अकाऊंट हॅक होऊ शकतं.
कारण या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडून सर्वेसाठी माहिती मागून घेतली जाईल, यात अशी माहिती तुमच्याकडून भरून घेतली जाईल की ज्यामुळे तुमचं फेसबुक अकाऊंट हॅक करणे त्यांना सहज शक्य होणार आहे.
सर्वात सोपी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, फेसबुकवर शेअर केलेली लिंक तुमच्या ओळखीच्या किंवा विश्वासू व्यक्तीची नसेल तर त्यावर अजिबात क्लिक करू नका. एखाद्याच्या फेसबुक वॉलवर दिसणार पॉर्न व्हिडीओ हा देखील तोच प्रकार असतो, ज्याच्या फेसबुक पेजवर हे शेअर झालं आहे, त्याविषयी त्याला कोणतीही कल्पना नसते. मित्राने मेसेज टाकल्यानंतर त्याला हा प्रकार लक्षात येतो, तेव्हा तात्काळ पासवर्ड बदलून घेणे महत्वाचे असते.
तुमच्या मित्रांनाही याबाबत माहिती मिळावी, म्हणून ही बातमी फेसबुकवर शेअर करा. फेसबुकचं डिसलाईक बटन देण्याची प्रक्रिया सुरू आहे, ते आपोआपचं प्रोफाईलवर येणार आहे, त्यासाठी कोणत्याही साईटवर जाऊन किंवा लिंकवर क्लिक करण्याची गरज नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.