'फ्रीडम 251' प्रत्येक फोनमागे कंपनीला 31 रुपयांचा नफा

फक्त 251 रुपयांमध्ये मिळणाऱ्या 'फ्रीडम 251' या स्मार्टफोनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Updated: Feb 22, 2016, 08:46 AM IST
'फ्रीडम 251' प्रत्येक फोनमागे कंपनीला 31 रुपयांचा नफा title=

मुंबई: फक्त 251 रुपयांमध्ये मिळणाऱ्या 'फ्रीडम 251' या स्मार्टफोनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पण या प्रत्येक फोनच्या विक्रीमागे कंपनीला 31 रुपयांचा नफा होणार आहे. 
हा स्मार्ट फोन बनवणारी कंपनी 'रिंगिंग बेल'चे एमडी मोहित गोयल यांनी ही माहिती दिली आहे. 

251 रुपयांच्या स्मार्ट फोनच्या घोषणेनंतर या फोनवर आणि कंपनीवर प्रश्नचिन्हही उपस्थित झाले. कंपनीच्या नोयडामधल्या ऑफिसमध्ये जाऊन पोलीस आणि आयकर विभागानं चौकशी केली.

पण मी कोणताही गुन्हा केलेला नसताना मला 'भगोडा' का म्हंटलं जात आहे, मी कायदेशीररित्या व्यवसाय करत आहे, असं गोयल म्हणाले आहेत. तसंच आम्ही सांगितलेल्या किमतीलाच हा फोन विकणार आहोत, असंही गोयल यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.