मुंबई: फेसबुकच्या इमोजी सुपरहिट आहेत. आपल्या प्रत्येक फिलिंगची इमोजी या सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्याला मिळेल. मात्र फेसबुकची ही इमोजी वादाचा मुद्दा बनेल असं खुद्द झुगरबर्कलाही वाटलं नसेल.
मागील काही दिवसांपासून फेसबुक एका वादानं हैराण आहे. 16 हजार लोकांनी चेंज डॉट ओआरजीची एक ऑनलाइन पेटिशन साइन केली आणि त्यामुळं अखेर दबावाखाली येऊन फेसबुकला ही फिलिंग फॅटची इमोजी काढावी लागली.
फिलिंग फॅट ही इमोशन नसून एक समस्या आहे, ज्यामुळं अनेक जण त्रस्त असतात, असं म्हणत एका ग्रृपने ऑनलाइन पेटिशन टाकली. मग हळुहळू त्यात 16 हजार लोकांनी सही करून सहभाग नोंदवला.
यानंतर मंगळवारी रात्री फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, की त्यांना माहिती झालंय... फॅट इमोजीमुळं शरीराची निगेटिव्ह इमेज होण्यास वापरली जाते. विशेष करून जे त्या समस्येशी संबंधित आहेत. त्यामुळं आम्ही फिलिंग फॅट इमोजी काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.