मुंबई : तुम्हाला सेल्फी काढण्याचा भलताच शौक असेल आणि तुम्ही तुमच्या सध्याच्या स्मार्टफोनच्या फ्रंट कॅमेऱ्यावर फारसे खुश नसाल तर यूएसच्या इनफोकस नावाच्या एका कंपनीनं तुमच्यासाठी एक ऑप्शन उपलब्ध करून दिलाय.
'इनफोकस'चा ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असलेला 'एम २' हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झालाय. 'सेल्फी'चा शौक असणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक खिशाला परवडेबल असा स्वस्त पर्याय आहे.
इनफोकसच्या 'एम २'ची वैशिष्ट्ये...
ऑपरेटिंग सिस्टम : अॅन्ड्रॉईड ४.४ किटकॅट
स्क्रीन : एलसीडी स्क्रीन ४.२ इंच
ड्युएल सिम सपोर्ट
बॅटरी : २०१० मेगाहर्टझ
प्रोसेसर : १.३ गीगाहर्टझ क्वॉड कोअर मीडियाटेक एमटी ६५८२ प्रोसेसर
रॅम : १ जीबी
इंटरनल मेमरी : ८ जीबी (मायक्रो एसडीकार्डच्या साहाय्याने ६४ पर्यंत वाढविता येणार)
रिअर कॅमेरा : ८ मेगापिक्सल (एलईडी फ्लॅशसहीत)
फ्रंट कॅमेरा : ८ मेगापिक्सल (एलईडी फ्लॅशसहीत)
ई कॉमर्स वेबसाईट 'स्नॅपडील'वर हा फोन तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करता येईल. या वेबसाईटवर या फोनची किंमत केवळ ४,९९९ रुपये आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.