हॉटेलमध्ये भेटायला बोलावलेली फेसबुक फ्रेंड निघाली पत्नी

तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत आहात का? करत असाल तर सावधान बाळगायला हवी. तासनतास मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर चॅट करणे अगदी सोपे झालेय. मात्र, त्याचा धोकाही आहे. त्यांने तिची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली.  ज्यावेळी भेटायचे ठरले त्यावेळी ही मैत्रिण त्याची पत्नीच निघाली आणि भांडाफोड झाला.

Updated: Nov 23, 2014, 01:04 PM IST
हॉटेलमध्ये भेटायला बोलावलेली फेसबुक फ्रेंड निघाली पत्नी title=

नवी दिल्ली : तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत आहात का? करत असाल तर सावधान बाळगायला हवी. तासनतास मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर चॅट करणे अगदी सोपे झालेय. मात्र, त्याचा धोकाही आहे. त्यांने तिची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. ज्यावेळी भेटायचे ठरले त्यावेळी ही मैत्रिण त्याची पत्नीच निघाली आणि भांडाफोड झाला.

चक्क फेसबुकवर चॅट करणाऱ्याला मैत्रिणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांने ती स्वीकारली. मैत्री वाढत गेली. त्यांने तिला थेट हॉटेलला भेटायला बोलवले. ती आली. मात्र, तो हादरला. कारण ती त्याची पत्नीच निघाली. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

कुवेतमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. महिलेचं नाव वाचताच रिक्वेस्ट स्वीकारली. त्यांच्यात मैत्रीचा धागा अधिक बांधला गेला. दोघांमध्ये अनेकदा चॅटिंग झाली. ही चॅटिंग इतकी पुढे गेली की दोघांनी हॉटेलमध्ये भेटण्याचं ठरवलं.

आपला पती दुसऱ्या एका महिलेच्या प्रेमात पडलाय. याचा पत्नीला संशय आला होता. पतीची कोणत्या तरी फेसबुक फ्रेंडसोबत डेटिंग करण्याची इच्छा होती. त्यामुळे तिने फेसबुकवर फेक अकाऊंट ओपन करुन पतीला धडा शिकविण्याचा फंडा अवलंबला. तिने पतीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.

भेटीचा कार्यक्रम ठरल्यानंतर तो हॉटेलमध्ये आनंदाने पोहोचला.  समोर असलेली फेसबुक फ्रेंड ही दुसरी-तिसरी कोणी नसून त्याची बायको होती.हॉटेलमध्ये पत्नीला पाहून त्या व्यक्तीला कापरं भरलं. सगळा उत्साह क्षणात मावळला. याचवेळी दोघांमध्ये भांडण झालं आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. फेसबुक फ्रेंडसोबत डेटिंग करण्याच्या इच्छेमुळे पत्नीने आपल्या पतीपासून घटस्फोट घेण्याचं ठरवलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.