‘अँन्ड्रॉईड’बद्दल या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

अँन्डाईड ऑपरेटिंग सिस्टम आल्यापासून तंत्रज्ञान विश्वात खूप मोठी क्रांती झाली आहे. मोबाईल फोन आणि टॅबलेट या सेगमेंटमध्ये आपल वर्चस्व सिद्ध केल्यानंतर अँन्डाईड ओएस कम्प्युटरच्या दुनियेत ही आपली जागा बनवत आहे. गूगल आता अँन्डाईड ओएसवर चालणारा कम्प्युटर घेऊन येणार आहे.

Updated: Dec 12, 2015, 05:15 PM IST
‘अँन्ड्रॉईड’बद्दल या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का? title=

मुंबई : अँन्डाईड ऑपरेटिंग सिस्टम आल्यापासून तंत्रज्ञान विश्वात खूप मोठी क्रांती झाली आहे. मोबाईल फोन आणि टॅबलेट या सेगमेंटमध्ये आपल वर्चस्व सिद्ध केल्यानंतर अँन्डाईड ओएस कम्प्युटरच्या दुनियेत ही आपली जागा बनवत आहे. गूगल आता अँन्डाईड ओएसवर चालणारा कम्प्युटर घेऊन येणार आहे.

एवढंच नाही तर अँन्डाईड ओएसवर चालणाऱ्या स्मार्ट-वॉचपासून ते होम अप्लायन्सेस बाजारात आलेत सुद्धा... असे स्मार्ट होम अप्लायन्सेस अँन्डाईड डिव्हाईससोबत कनेक्ट होतात आणि यूजर्सच्या कमांडवर काम करतात... आणि यामुळेच अँन्डाईड पूर्ण जगावर आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरलाय.

गूगलच्या अँन्डाईडशी संबंधीत काही तथ्थ जे कळल्यानंतर अँन्डाईडच्या लोकप्रियतेचे खरे कारण तुम्हालाही कळेल.

- अँन्डाईड ऑपरेटिंग सिस्टम २००३ ला बनवण्यात आले होते. परंतू तुम्हाला कळल्यानंतर आश्चर्य वाटेल की या ओएसला मोबाईलसाठी नाही, तर डिजिटल कॅमेरासाठी बनवण्यात आले होते. परंतु, या ऑपरेटिंग सिस्टमबद्दल लोकप्रियता वाढू लागल्यामुळेच मोबाईल फोनमध्ये त्याचा वापर सुरू झाला

- अँन्डाईड ओएस गूगलने बनवले नाही, २००५ मध्ये हे गूगलने विकत घेतले होते.

- पहिला अँन्डाईड स्मार्टफोन २२ ऑक्टोबर २००८ ला बाजारात आला होता, तर अॅप्पलचा पहिला स्मार्टफोन २९ जून २००७ मध्ये बाजारात दाखल झाला.

- पूर्ण जगातील स्मार्टफोन यूजर्समध्ये ८० टक्के हिस्सा हा अँन्डाईड ओएस वापरणाऱ्या यूजर्सचा आहे.

- अँन्डाईडचे १२ असे फ्री मोबाईल अॅप आहेत ज्यांना १०० कोटी पेक्षाही जास्त वेळा डाऊनलोड केले गेले आहे.

- पूर्ण जगात ४०० कंपन्या अँन्डाईड ओएसवर आधारित ४००० पेक्षा अधिक मोबाईल हँडसेट बनवत आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.