नवी दिल्ली : तुम्हीही नवीन कम्प्युटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मार्केटमध्ये एक स्वस्त पर्याय उपलब्ध झालाय.
'चिप' नावाचा या कम्प्युटरची किंमत आहे अवघी ५९८ रुपये... या कम्प्युटरची अॅडव्हान्स बुकिंग अगोदरच सुरू झालीय. हा कम्प्युटर एक डेव बोर्ड आहे. परंतु, याचे फिचर्स मात्र एखाद्या कम्प्युटरपेक्षा कमी नाही.
कंपनीच्या मदतीनं या प्रोजेक्टमध्ये जगभरातून ३९,५६० लोकांनी मिळून जवळपास १३,७० करोड रुपये जमा केलेत. याबद्दल कंपनीनं आपल्या वेबसाईटवर माहिती दिलीय.
'चीप' कम्प्युटरचे फिचर्स...
प्रोसेसर : १ गीगाहर्टझ आरएआरएम
रॅम : ५१२ एमबी डीडीएक्स
इंटरनल स्टोअरेज : ४ जीबी
इतर फिचर्स : ब्लूटूथ, वायफाय, ३ यूएसबी पोर्ट, मायक्रो यूएसबी पोर्ट, माइक बिल्ड इन, ऑडिओ आणि व्हिडिओ आऊटपूट पोर्ट, डेबिअन लीनू अॅन्ट ऑपरेटिंग सिस्टम
'चीप' कम्प्युटरला वापरण्यासाठी मॉनिटरची गरज असेल. सोबतच किबोर्ड आणि माऊसपैंकी तुम्हाला एक यूएसबी तर दुसरं वाय-फाय नेटवर्कनं कनेक्ट करावं लागेल. ऑडिओ आणि व्हिडिओ आऊटपूट पोर्टनं तुम्ही मॉनिटरला आऊटपूट देऊ शकाल.... शिवाय, यामध्ये गेमही खेळता येऊ शकतो.
कम्प्युटरसाठी किकस्टार्टर डॉट कॉमवर जाऊन 'प्री-ऑर्डर चिप'वर क्लिक करा. यानंतर, प्री-ऑर्डर फॉर ९ डॉलरवर क्लिक करा. यामध्ये आपला ई-मेल आयडी नोंदवून आपलं सबस्क्रिप्शन कन्फर्म करा.