चार्जिंगला लावलेल्या मोबाईलच्या स्फोटात मुलाचा मृत्यू

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवरून संभाषण करणे टाळणं कधीही हिताचं आहे. कारण पश्‍चिम बंगालमधील चिरडीह गावामध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. यात सात वर्षांच्या मुलाचा आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, स्फोट झालेला मोबाईल हा 'चायना मेड' असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Updated: Mar 31, 2015, 04:58 PM IST
चार्जिंगला लावलेल्या मोबाईलच्या स्फोटात मुलाचा मृत्यू   title=

कोलकाता : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवरून संभाषण करणे टाळणं कधीही हिताचं आहे. कारण पश्‍चिम बंगालमधील चिरडीह गावामध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. यात सात वर्षांच्या मुलाचा आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, स्फोट झालेला मोबाईल हा 'चायना मेड' असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुलिया जिल्ह्यातील चिरडीह या गावातील एका घरामध्ये मोबाईल चार्जिंगला लावण्यात आला होता. इयत्ता पहिलीमध्ये शिकणारा विद्यार्थ्याने मोबाईला हात लावल्यानंतर त्याचा स्फोट झाला. 

कुटुंबीयांनी पाणी मारून आग आटोक्‍यात आणली. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.